औरंगाबाद : मागील दोन महिन्यापासून सिडको-हडको या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या भागासाठी मनपा प्रशासनाने चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे ठरवले होते. परंतु मागील दोन महिन्यापासून सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे या भागातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर सिडको हडको परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांना देण्यात आला आहे.
या निवेदनात म्हटले आहे , सिडको-हडको या भागात १०० टक्के नळ हे अधिकृत कनेक्शन असून मनपा प्रशासनाकडे ते नियमितपणे पाणी पट्टी भरतात. या भागातून मनपाला मिळणारी पाणीपट्टी वसुली ही शहराच्या इतर भागातील तुलनेत जास्त आहे. या भागात मनपा प्रशासनाने ठरवल्याप्रमाणे चार दिवसांआड पाणीपुरवठा होण्यासाठी जेवढे पाणी लागते आवश्यक आहे तेवढे पाणी एन-७ जलकुंभ व हरसिद्धी जलकुंभ साठी मिळाले पाहिजे तरच पाणी पुरवठा व्यवस्थित होऊ शकतो.
सिडको-हडको या भागासाठी पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी संपूर्ण औरंगाबाद शहरांमधील वसाहतीत सारखा कालावधी निश्चित केल्यास सिडको-हडको भागास पाणीपुरवठा समस्या निर्माण होणार नाही. सिडको-हडकोचा हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा संपूर्ण शहरांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. यासाठी आयुक्तांना हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष दत्ता भांगे, कार्याध्यक्ष कयूम शेख, शहर सरचिटणीस रवी तांगडे पाटील, शहर सचिव नागेश भालेराव यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- हभप बाजीराव महाराज जवळेकरांना देवाज्ञा
- कोरोनात सेवा देणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना नियमित करा-आ.सुरेश धस
- सौभाग्याचे लेणे तब्बल २२ वर्षांनी परत मिळाले
- मुनगंटीवारांची राष्ट्रपती राजवटीची भाषा ही मोदींची राजकीय भूमिका – नाना पटोले
- ‘त्या’ डॉक्टरला अटक करा : एमआयएम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

