औरंगाबाद : कोरोनाचा शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा रद्द करून मूल्यांकनाच्या आधारे गुण देण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तरी अजूनही आणि त्यांचे प्रवेश झालेले नाही. प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन दहा दिवस उलटले आहेत मात्र अजूनही संपूर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेली नाही.
आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाच्या १५ टक्के मुलांना शुल्क न भरल्याने टीसी मिळालेले नाहीत. राज्यमंडळाचे ५ टक्के विद्यार्थी असे आहेत ज्यांना टीसी आणि गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. अशा विद्यार्थ्यांकडून आता हमीपत्र लिहून प्रवेश देण्याची वेळ महाविद्यालयांना आली आहे. १६ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहिर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. परंतु शासनाने अकरावीसाठी सीईटी जाहिर केल्याने प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संभ्रम निर्माण झाले होते.
उच्च न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द ठरवल्याने प्रवेश प्रक्रियेचा मार्ग माेकळा झाला आहे. परंतु लांबलेल्या प्रवेश प्रक्रिया आणि संभ्रमावस्थेमुळे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात प्रवेश घेत आहेत. एवढेच नाही तर शहरात ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला चौकशी केले त्यातील बहुतांश विद्यार्थी प्रवेशासाठी आलेच नाहीत. तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यांची मात्र टीसी न मिळणे आणि गुणपत्रिका अद्यापही हातात नसल्याने आयसीएसई, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत असल्याचे महाविद्यालयांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात माझाच बळी जातोय’, प्रताप सरनाईकांची खंत
- ‘औरंगाबादच्या दीक्षा शिंदेंची नासात निवड ही अफवा!’, खा.जलील यांचे ट्विट
- ‘भारताने अद्यापही तालिबानवर बंदी का घातली नाही?’, ओवेसींचा मोदींना सवाल
- महाविकास आघाडीचा निर्णय! आशा स्वयंसेविकांना हजार रुपये, गटप्रवर्तकांना १२०० रुपये वाढ
- महाविकास आघाडीतील तीन पक्ष आता शेवटची तडफड करतायत – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
