मुंबई : केंद्र सरकार श्रेय घेण्यात गुंतल्यामुळेच भारतात कोरोनाचे संकट वाढले, अशी तीव्र शब्दात टीका नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केली आहे. संभ्रमावस्थेत असलेल्या केंद्र सरकारने श्रेय घेण्यावरच लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच कोरोनाचा प्रसार रोखण्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने भारतात कोरोनाची गंभीरस्थिती निर्माण झाली, असेही ते म्हणाले. मुंबईत राष्ट्र सेवा दलातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले. याचवेळी ऑक्सिजन आणि लसीचा तुटवडा निर्माण झाला. यावर काही वैद्यकीय तज्ज्ञ तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली जात आहे. यावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी आपली भूमिका मांडली आहे.
ते म्हणाले, भारतातील कोरोनाच्या परिस्थिती निर्माण होण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संभ्रमावस्थेत असलेल्या केंद्र सरकारने झालेल्या गोष्टींचे श्रेय घेण्यावरच लक्ष केंद्रित केले. मात्र, कोविड १९ चा प्रसार रोखण्याकडे मात्र दुर्लक्ष केले. त्यामुळे कोरोनाची गंभीर स्थिती निर्माण होण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली आहे.
केंद्र सरकार जागतिक स्तरावर आपली प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करीत राहिले. पण त्याचवेळी देशात कोविडची समस्या वाढत गेली. लोकांना त्याचा विळखा बसण्याकडे दुर्लक्ष करत राहिले. भारतात आधीच असलेल्या सामाजिक असमानता, विकासाचा मंद वेग आणि बेरोजगारी या समस्या कोरोना संसर्गाच्या काळात अजूनच गंभीर झाल्या, असेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सोयाबीन बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करा’, शिवसेना खासदाराचे ‘महाबीज’ला पत्र
- ६२ दिवसांनंतर जालना जिल्हा उद्यापासून होणार अनलॉक
- विनायक मेटेंच्या पुढील सर्व आंदोलनात भाजप सहभागी होणार-आशिष शेलार
- शनिवारी फक्त दिव्यांगांनाच लस; बीडचा ‘स्पेशल डे’ पॅटर्न राज्यात राबवणार-धनंजय मुंडे
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!


