मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुन दरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.
भारतीय क्रिकेट टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी लंडनला पोहोचली आहे. तर, न्यूझीलंडची इंग्लंड विरुद्ध टेस्ट मॅच खेळत आहे. लॉर्ड्समध्ये सुरु असलेल्या या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन याची चिंता वाढली असून त्याचा फायदा टीम इंडियाला होणार आहे.
लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडची टीम 378 रन काढून ऑल आऊट झाली. डेवॉन कॉनवे याचे द्विशतक हे न्यूझीलंडच्या इनिंगचं वैशिष्ट्य होते. त्याने पदार्पणातच द्विशतक झळकावण्याची कामगिरी केली. त्याला उत्तर देताना इंग्लंडची टीम 275 रनवरच ऑल आऊट झाली. पहिल्या इनिंगचा हिरो डेवॉन कॉनवे 23 रन काढून आऊट झाला. त्यानंतर मैदानात आलेला कॅप्टन विल्यमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला. याचा फायदा टीम इंडियाला होणार असल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
- उस्मानाबाद शहरात बालविवाह थांबवण्यात महिला आणि बालविकास विभागाला यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

