Share

कुंभमेळ्यात कोरोनाचा स्फोट ! दोन दिवसात रुग्ण संख्या हजारावर

Published On: 

हरिद्वार: देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच, येत्या काळात अनेक राज्यात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मात्र या बिकट परिस्थितीत देखील हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आढावा घेतल्यानंतर . केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कुंभमेळा काळात करोनाचा उद्रेक होण्याचा भीती व्यक्त केली होती. यातच आता, या महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झालं आहे.

त्यांनतर आता केवळ गेल्या दोन दिवसात हरिद्वारमध्ये दोन दिवसात एक हजाराहून अधिक करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये करोनाचा मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामध्ये मंगळवारी ५९४ म्हणजे जवळपास ६०० करोनाबाधित आढळून आले आहेत. सोमवारी हरिद्वारमध्ये ४०८ रुग्ण आढळले होते. सध्या हरिद्वारमध्ये २ हजार ८१२ रुग्ण उपचार घेत आहे.

 महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!