मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या हा वैयक्तिक आयुष्यातही एक अष्टपैलु व्यक्तिमत्व आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर हार्दिक पांड्या घरी पोहोचताच हार्दिक कुक बनला आहे. हार्दिक पांड्याची वहिनी कृणाल पांड्याची पत्नी पंखुडीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक नूडल्स बनवताना दिसत आहे.
या व्हिडीओत हार्दिक काळ्या रंगाचा बाथ रोब घालून नूडल्स बनवताना दिसत आहे. हार्दिकचा हा अवतार त्याच्या चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस पडला आहे. अल्पावधीतच हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तसेच चाहत्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच हार्दिकने डान्सचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला होता. चाहत्यांनी त्या व्हिडिओला देखील मोठ्या प्रमाणात पसंत केले होते.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएल स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनचा खेळाडूंना सतर्कतेचा इशारा, म्हणाले…
- आयपीएल रद्द झाल्यानंतर विराटची नवी इनिंग; कोरोना बचाव कार्यात ‘या’ व्यक्तिची घेतली भेट
- मुंबईची बातच न्यारी; ‘असा’ घेतला आयपीएल स्पर्धेचा निरोप
- परदेशी खेळाडूंचा मायदेशी परतण्याचा प्रवास सुरु !
- स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने ‘या’ संघाना आहे पुनरागमनाची संधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

