नवी दिल्ली : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या परदेशी क्रिकेटपटूंचा आपापल्या देशांत परतण्याचा प्रवास सुरू झाला.
ऑस्ट्रेलियात भारतातून येणाऱया व्यक्तींना परवानगी नसल्यामुळे या देशातील क्रिकेटपटूंसाठी चार्टर्ड विमानाची सुविधा बीसीसीआयकडून पुरवण्यात येणार आहे. यादरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनने भविष्यात परदेशी टी-20 लीग खेळण्याचा निर्णय घेण्यापूर्वी खेळाडूंना सतर्क केले आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचे (एसीए) मुख्य कार्यकारी टोड ग्रीनबर्गने भविष्यात परदेशी टी-20 करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी जोखमींचा विचार करा, कारण विकसनशील देशात महामारी सर्वत्र पसरत आहे. ग्रीनबर्ग यांनी ESPNcricinfo ला म्हटले, ‘मला खात्री नाही की हे शांतपणे (भविष्यात) निर्माण करेल परंतु करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी खेळाडूंनी त्यांची योग्य काळजी घेत असल्याचे सुनिश्चित करेल. विशेषत: कोविड सह आमच्या डोळ्यांसमोर जग अक्षरशः बदलत आहे आणि जगाच्या त्या बाजूला अर्थातच प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.’
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रत्येक गोष्ट मोदींवर ढकलायची असेल तर तोंड काळे करा आणि कडी लावून निवांत घरी बसा’
- ‘पंतप्रधानांनी ३७० कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच मराठा आरक्षणाबाबत दाखवावी’
- कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा परिणाम! रेल्वेकडे फिरवली प्रवाशांनी पाठ
- लसीकरणाला अडथळा! जेष्ठ लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
- परदेशी खेळाडूंचा मायदेशी परतण्याचा प्रवास सुरु !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

