Share

IPL 2022 DC vs RCB : वानखेडेवर घोंगावलं ‘कार्तिक’वादळ..! बंगळुरूचं दिल्लीला १९० धावांचं आव्हान

Published On: 

मुंबई: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या जात असलेल्या सामन्यात नाणेफेकीचे नाणे ऋषभ पंतच्या बाजूने पडले, त्यानंतर त्याने बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ज्याला प्रत्युत्तर म्हणून रॉयल चॅलेंजर्सने निराशाजनक सुरुवात केली.सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर आधी मॅक्सवेल आणि शेवटला दिनेश कार्तिक च्या खेळीने आरसीबीला १९० च्या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. पॉवरप्लेच्या आतच संघाचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. ज्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली (Virat kohli) ४१व्या षटकात धावबाद झाला. त्यानंतर मॅक्सवेलने (glenn maxwell) ३४ चेंडूत ५५ धावांची खेळी करत आरसीबीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आणले. मात्र मॅक्सवेल बाद झाल्यानंतर आरसीबीची खेळी पुन्हा डळमळताना दिसली.

ग्लेन मॅक्सवेल बाद झाल्यानंतर या हंगामात आरसीबीसाठी फिनिशरची भुमीका बजावणारा दिनेश कार्तिक (dinesh kartik) फलंदाजीस आला. कार्तिकने फलंदाजी करताना ३४ चेंडूत ६६ धावा केल्या. ज्यात ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. कार्तिकच्या फिनिशर खेळीने संघाला १८९ पर्यंत पोहचवले. तर गोलंदाजीत दिल्लीकडून शार्दूल ठाकूर , खलील अहमद , अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतल्या.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!