Share

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ग्राहकांचा आत्मविश्वास कमी झाला आरबीआयच्या सर्वेक्षणातून समोर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे. देशभरात गेल्या २४ तासात १ लाख ३१ हजार ९६८ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा १ कोटी ३० लाख ६० हजार ५४२ वर पोहोचला आहे.

दरम्यान दुसरीकडे गतवर्षीच्या लॉकडाऊनपासून ते आजतागायत आपल्या आयुष्यावर असंख्य निर्बंध आले आहेत. आत्ताशा कुठे नवीन सुरुवात करणार तर पुन्हा एकदा कोरोनाने पूर्वरुप धारण केले. पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या अंधाराने आपले जीवन व्यापून टाकले. कुठलाही विरंगुळा नाही, आलेली मरगळ, उदासिनता, आर्थिक अडचणी यांमुळे आज अनेकांना मानसिक आजार जडत आहेत. तर वाढत्या आर्थिक समस्यांमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास कमी होत असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

या सर्वेक्षणानुसार, जानेवारीत 55.5 च्या तुलनेत मार्चमध्ये ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक 53.1 ने खाली आला. कोरोना संक्रमणाच्या वाढीमुळे ग्राहकांच्या आत्मविश्वासाची ही घसरण झाली असून अर्थव्यवस्था नाजूक होण्याची आशंका, नोकरी, उत्पन्न आणि चलनवाढीची वाढ ही त्यामागील कारणे आहेत. तर ग्राहकांचा भविष्यकाळातील आत्मविश्वासही कमी झाला आहे आणि तो 117.1 वरून 108.8 वर आला आहे. 13 मोठ्या शहरांमध्ये आरबीआयचे हे सर्वेक्षण केले असून आर्थिक परिस्थिती, रोजगार निर्मिती, महागाई आणि उत्पन्न आणि खर्चाच्या मुद्द्यांवरील सर्व्हेमध्ये सामील असलेल्या ग्राहकांची अपेक्षा माहित करून घेण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!