नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर असल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवहार हे मोठ्या प्रमाणात केले गेले. तरत आता डीजीटल व्यवहार लोकांच्या अंगवळणी पाडाळे आहेत. यामध्ये डिजिटल पेमेंटसाठी भारतात मोठ्या प्रमाणात पेटीएम, गुगल पे , फोन पे हे अॅप वापरलं जातं.लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन केली जातात
मात्र यामुळे अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या ऑफरला देखील बळी पडत असतात. याचा फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक होणं आवश्यक आहे. यामध्ये आता स्टेट बॅंकेने आपल्या ग्राहकांना बॅंक खात्याची माहिती इतरांना देण्यापासून सावध राहण्यास स्टेट बॅंकेने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे.
सध्या बँकेच्या ग्राहकांना स्टेट बॅंकेचे कर्मचारी असल्याचे सांगून फसवणूक केली जात आहे. सायबर गुन्हेगार ग्राहकांच्या खात्यात ऑनलाईन स्वरुपात फिक्स्ड डिपॉझिट बनवत आहेत, अशी माहिती स्टेट बॅंकेला मिळाली आहे. या सायबर गुन्हेगारांचा हेतू सोशल इंजिनियरिंग फ्रॉड करणे हा आहे. यासाठी स्टेट बॅंकेकडून नियमितपणे ग्राहकांना धोक्याच्या सूचना दिल्या जातात. अशीच सूचना यावेळी देखील बँकेने दिले आहे. त्याचबरोबर आपला पासवर्ड, ओटीपी, सीव्हीव्ही नंबर आणि याच प्रकारची कोणतीही माहिती कोणालाही देऊ नये. आम्ही आमच्या ग्राहकांकडून कधीही फोन, ई-मेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून कोणतीही माहिती मागत नाही, असे स्टेट बॅंकेकडून सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- अंबाजोगाईच्या ‘त्या’ दाम्पत्याच्या मृत्युबाबत ट्विस्ट, अमेरिकेतील मीडियाने केला ‘हा’ दावा
- डेटा पुरेसा नसल्याने WHO ने फेटाळली सिरम इन्स्टिट्यूट ‘ही’ मागणी
- एमपीएससीच्या मुद्यावरून मिटकरींनी पडळकरांना डिवचले; ट्वीट करून लगावला टोला
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पंढरपुरातील ‘त्या’ सभेच्या आयोजकांवर अखेर गुन्हा झाला दाखल
- ‘भिडेंनी वैज्ञानिक, डॉक्टरांचा अपमान केलाय,त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करा’

