परभणी : कोरोनाच्या संसर्गाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना संसर्गासह उपाययोजनांबाबतचा आढावा केंद्रीय पथकाने घेण्यास सुरवात केली. आहे. या वेळी कोव्हिड सेंटर लसीकरण केंद्राची पाहणी केल्याचा रिपोर्ट केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासह शहरातील कोविड व व्हॅक्सिनेशन सेंटरला पथकाने या वेळी भेटी दिल्या आहेत.
तर जिल्ह्यात गुरुवारी केंद्राचे दोन सदस्यीय पथक दाखल झाले आहे. यातील पथकात पाँडेचेरी येथील असिस्टंट प्रोफेसर डॉ. दिनेश बाबू तसेच नागपूर येथील असोसिएट प्रोफेसर डॉ. रंजन सोळंकी यांचा समावेश आहे. परभणीत दाखल होताच सदस्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी कोरानाच्या परिस्थितीबाबत चर्चा देखील केली. या चर्चेतून त्यांनी प्राथमिक माहिती घेतली. तसेच पुढील नियोजन यावेळी करण्यात आले. शुक्रवारी या पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर तसेच कोरोना लसीकरण सेंटरला भेटी दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ, प्रकाश डाके, डॉ. किशोर सुरवसे यांच्यासह आदी वैद्यकीय अधिकारी त्यांच्यासमावेत होते.
पथकातील सदस्यांनी शहरातील कोविड सेंटरची पाहणी केली. त्यात त्यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयी – सुविधा, उपचार याबाबत माहिती जाणुन घेतली. त्याचबरोबर लसीकरण केंद्रांना भेटी देत तेथील अधिकारी – कर्मचाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे. पाथरी रस्त्यावरील डॉ. प्रफुल्ल पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे पथकाने या वेळी भेट दिली. त्यावेळी तेथील लसीकरण केंद्रासही भेट दिली. शहरातील केलेल्या रुग्णालयाच्या पाहणीची माहिती केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकारी, मंत्री तसेच सचिव पातळीवरील अधिकारी यांना ही माहिती देण्यात येणार असल्याचे या वेळी पथकातील अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.
- एमपीएससीच्या मुद्यावरून मिटकरींनी पडळकरांना डिवचले; ट्वीट करून लगावला टोला
- यम है हम! जालनावासियांना घरी बसवण्यासाठी यमराज आले रस्त्यावर
- भारतातील ‘ या ‘ शहरांमध्ये असतील टेस्ला कारचे शोरुम
- ‘बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा रीशेड्यूल केल्या पाहिजेत’
- सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने रोहित शर्माविषयी केला मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
