Share

मोठी बातमी : राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन ?, मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

Published On: 

मुंबई : देशभरात करोना व्हायरसचा उद्रेक सुरूच आहे. करोना रुग्णांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. राज्य सरकारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरूवारी देशात एकूण १.३१ लाख नवीन करोना रुग्णांची भर पडली. तर, जवळपास ८०० जणांचा मृत्यू झाला. देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राज्यातील परिस्थिती अधिकच चिंताजनक होत चालली आहे. अशात पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 10 लाख पर्यंत जाऊ शकते अशी शक्यता ग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. त्यासोबतच राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत देखील त्यांनी दिले आहेत.

त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील लॉकडाऊन बाबत मोठे विधान केले आहे. ‘जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र लॉकडानच्या दिशेने वाटलाच करेल’, असं राजेश टोपे यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे. ‘आम्ही लॉकडाउनच्या समर्थनात नाही, पण जर परिस्थिती सुधारली नाही तर साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन महत्वाचा आहे,’ असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

त्यानंतर आता राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच असल्यामुळे राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत उद्या दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कडक निर्बंध लादूनही परिस्थिती बदलत नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतंय. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे सरकार आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!