Share

MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचं विनायक मेटे यांनी केले स्वागत

Published On: 

मुंबई – येत्या ११ एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी जोरदार मागणी उमेदवारांनी केली होती. तसेच सरकारमधील आणि विरोधातील या दोन्ही बाजूच्या नेेत्यांनीही ही मागणी लावून धरायला सुरुवात केल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान,गेल्या काही दिवसांपासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी देखील गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष रस्त्यावर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता परीक्षार्थींच्या सुरक्षेसाठी सरकारने हा निर्णय घावा, अशी मागणी केली जात होती.

या पार्श्वभूमीवर ठाकरे आज दुपारी दीडच्या सुमारास बोलावलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा नंतर कधी घेतल्या जातील, त्याविषयी देखील निर्णय झाल्यावर कळवण्यात येईल, असं देखील या बैठकीत ठरल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान,MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचं स्वागत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलंय. 11 तारखेनंतर जे विद्यार्थी परीक्षेला बसतील, ज्यांना वयाची अडचण येईल त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मेटे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!