औरंगाबाद : गेल्या वर्षभरापासुन कोरोना महामारीचा महाराष्ट्र राज्यावर पुन्हा उद्रेक झाल्यामुळे, महाराष्ट्राची जीवनवाहिनी एसटी व एसटी कामगार यांच्यावर पुन्हा संकट ओढवले आहे. इंधन दरवाढीमुळे एसटीला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. एसटी कामगारांना महागाई भत्ता देण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन सेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, सद्यस्थितीत इंधन दरवाढ होत असल्यामुळे त्याचा फटका एसटीला बसत असुन ५०% प्रवासी क्षमतेने एस.टी. बस चालवण्याचे शासकीय आदेश असल्यामुळे परिणाम स्वरुप एस.टी.च्या आर्थिक उत्पन्नावर विपरित परिणाम होत आहे. मात्र याच अवस्थेत खाजगी प्रवाशी वाहतुक जोमाने सुरु असुन एसटीच्या ५०% प्रवाशी वाहतुकीचा फायदा अप्रत्यक्षपणे खाजगी प्रवासी वाहतुकीला मिळत आहे.
त्यामुळे एस.टी.कामगारांच्या आर्थिक नुकसानीचा भार राज्यशासनाने उचलावा. एस.टी.कामगारांना डिसेंबर २०१९ पासुन महागाई भत्ता देण्यात आला नाही. प्रलंबित महागाई भत्ता थकित रकमेसह तात्काळ लागु करण्यात यावा. कोविड काळात मृत पावलेल्या एस.टी.कामगारांच्या कुटुंबाला शासन परिपत्रकानुसार ५० लाख विमा जाचक अटींमुळे मिळाला नाही तो तात्काळ देण्यात येऊन, कोरोनामुळे मृत एसटी कामगारांच्या एका मुलाला नोकरी देण्यात यावी.
वरील सर्व मुद्द्यावर तत्काळ अंमलबजावणी करुन महाराष्ट्राची जीवनवाहिनी एस.टी.ला संकटातुन बाहेर काढावे अशी विनंती प्रदेशाध्यक्ष हरी माळी, प्रदेश उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, प्रदेश सचिव प्रदिप गायकी, मराठवाडा अध्यक्ष अशोक पवार पाटील, जिल्हा अध्यक्ष उमेश दीक्षित, विभागीय अध्यक्ष एन. डी. दिनोरिया, मीरा चव्हाण यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना रुग्णांचा एकटेपणा घालवण्यासाठी नर्सने लढवली शक्कल
- खाजगी कोवीड सेंटरमधील लुट थांबवा, आ.संतोष दानवे यांचे आवाहन
- जो व्यक्ती कुटुंबाला सांभाळू शकत नाही, तो महाराष्ट्राला काय सांभाळणार ? – राणे
- निवडणुका असणाऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला – मनसे
- निवडणुका असणाऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला – मनसे


