औरंगाबाद : पेटमध्ये पात्र तसेच पेटमधून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पेटच्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी गुरूवारी (दि.१) दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. एंट्रन्स टेस्ट जानेवारी व मार्च महिन्यात घेण्यात आली होती.
कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ विषयात पेट घेण्यात आली. पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेत ४ हजार २९९ जण पात्र ठरले आहेत. पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल आदी) विद्यार्थ्यांची नोंदणी ७ ते ३० जून दरम्यान ऑनलाइन करण्यात आली. त्यास आता शासन आदेशानुसार कुलगुरुंनी १५ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर २० जुलैपर्यंत विद्यापीठात हार्ड कॉपी जमा करता येईल. या टप्प्यात पेट उत्तीर्ण झालेलेे तसेच पेटमधून सुट मिळालेले दुसर्या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत.
यामध्ये नेट, सेट, स्लेट, सीएसआयआर, जेआरएफ, गेट, जीपॅट, एफआयपी तसेच सीईटी मार्फत प्रवेश घेऊन पदवी प्राप्त एम.फिल विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. प्रशासनाने पीएचडीसाठी रिक्त असलेल्या जागा व संशोधक मार्गदर्शकांची यादी संकेतस्थळावर घोषित केली आहे. पुढील महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या (आरआरसी) बैठका घेण्यात येणार आहेत, अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारशी पंगा अंगलट ; ट्विटर विरोधात पाचवा गुन्हा दाखल
- ‘राज्य सरकार काय करतंय, तर बिल्डरांना सवलती देतंय’, भाजपचा हल्लाबोल
- …अन् आठवले म्हणाले, ‘त्यावेळी माझं जर फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते’
- ‘आयुष्य खूप सुंदर आहे…’ ; IPS अधिकारी लांडेंनी दिला युवकांना ‘हा’ मोलाचा सल्ला
- ‘मोदीजी का काम ही निराला हैं, राफेल में भी घोटाला हैं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

