मुंबई : कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून रखडलेली प्रस्तावित मालमत्ता करवाढ सन २०२१ ते २०२५ या कालावधीत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, तसा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. त्यास भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने विरोध केल्याने हा प्रस्ताव रोखून धरण्यात आला होता.
दरम्यान हा प्रस्ताव आता माघारी घेण्यात आल असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना खूप मोठा दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत मुंबईमध्ये प्रॉपर्टी टॅक्समध्ये कोणतीही वाढ होणार नाही. महापौरांनी अशी माहिती दिली की, मुंबईकरांवर कोणताही अतिरिक्त भार लादण्यात येणार नाही. कोरोनाची परिस्थिती असल्याने यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आम्हाला माहित नाही की अशी परिस्थिती कधीपर्यंत राहिल.
याआधी अशी अपेक्षा केली जात होती की यावर्षी मुंबईकरांना अतिरिक्त मालमत्ता कर द्यावा लागेल. पेडणेकर यांनी असं स्पष्ट केलं की प्रॉपर्टी टॅक्स वाढण्याचा केवळ प्रस्ताव आला आहे, त्याला मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान २०१७च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती.
प्रत्यक्षात या करातील फक्त दहा टक्के सर्वसाधारण कर माफ झाला असून, उर्वरित कर मुंबईकरांना भरावा लागतो आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये आधीच नाराजी असताना, तब्बल १४ ते २५ टक्के प्रस्तावित करवाढीचा फटका निवडणुकीत सेनेला बसू शकेल, असा सावधगिरीचा इशारा ज्येष्ठ नगरसेवकांनी दिला होता.
महत्वाच्या बातम्या
- अनेक गरजुंची इच्छा पुर्ण करणाऱ्या सोनु सुदने व्यक्त केली ‘ही’ इच्छा
- केजरीवाल सरकार शहिदांच्या कुटुंबीयांना देणार १ कोटी
- सदाभाऊ खोत यांनी घेतली आण्णा हजारेंची भेट ; केली ‘या’ विषयावर चर्चा
- ‘ठाकरे सरकारला कोरोनाची लागण ; हे सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही’
- ‘स्वबळाच्या गोंधळातून बाहेर पडा’ ; संजय राऊतांचा काँग्रेसला टोला


