मुंबई : मागील वर्षभरापासुन देशभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या या काळात सर्व जनजीवन ठप्प पडले होते. या काळात अनेक लोक समोर आले आणि माणुसकीच्या नात्याने गरजुंची मदत केली. यात सर्वात आघाडीवर नाव होते ते सोनु सुदचे.
कोरोना काळात केलेल्या मदतीमुळे सोनु सुद हा अनेकांसाठी देवदुत बनला आहे. कोरोना काळात सुरु केलेला मदतीचा ओघ अद्यापही सुरुच आहे. यामुळे त्याचे चाहते दिवसेंदिवस वाढतच आहे. यादरम्यान त्याच्या एका चाहत्याने सोनु सुदचे छायाचित्र असलेल्या एका भिंतीसोबत फोटो काढला आहे. तो फोटो सोनु सुदने स्वत: शेअर करत मला स्वत: इथे सेल्फी काढायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे. हे छायाचित्र असलेली भिंत नेमकी कुठे आहे याचा मात्र अद्यापही उलगडा झालेला नाही.
I also want a selfie here ❣️ pic.twitter.com/UMDgaH91sE
— sonu sood (@SonuSood) June 19, 2021
मात्र अनेकांची इच्छा पुर्ण करणाऱ्या सोनु सुदची ही इच्छा पुर्ण करण्याचे भाग्य कुणाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. यादरम्यान आज 20 जुन रोजी फादर्स डे निमित्त सोनु सुदने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनु सुद त्याच्या वडिलांच्या स्कुटरवर बसलेला दिसत आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो की,’तुम्ही माझ्या जवळ नाही पण तुमची आवडती स्कुटर नेहमीच माझ्या ताब्यात असेल. तुमची सदैव आठवण येते,’ असे लिहत हॅपी फादर्स डे असे कॅप्शनही दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- सलमान, कंगणा पाठोपाठ केआरकेच्या निशाण्यावर विद्या बालन, म्हणाला…
- केजरीवाल सरकार शहिदांच्या कुटुंबीयांना देणार १ कोटी
- सदाभाऊ खोत यांनी घेतली आण्णा हजारेंची भेट ; केली ‘या’ विषयावर चर्चा
- ‘ठाकरे सरकारला कोरोनाची लागण ; हे सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही’
- ‘स्वबळाच्या गोंधळातून बाहेर पडा’ ; संजय राऊतांचा काँग्रेसला टोला


