Share

Eknath Shinde : “पुराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातील वाळू व गाळ काढा”, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता पूर संरक्षणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी एक शास्त्रशुद्ध कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर येथील पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

तसेच पूर ओसरल्यानंतर जलजन्य आजारांचा फैलाव होऊ नये म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणांनी तात्काळ खबरदारी घ्यावी.  पात्रांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्याने नद्यांचे प्रवाह पूर्ववत होण्यासाठी मदत होईल यासाठी जलसंपदा विभागाने गाळ काढण्याबाबत उपाययोजना कराव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान राज्यात पुरामुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत तसेच शेती तसेच इतर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून त्याचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात पावसामुळे १०९ मृत्यूंपैकी साठ टक्के मृत्यू वीज पडून झाले आहेत. यावरही मदत व पुनर्वसन विभागाने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!