🕒 1 min read
नवी दिल्ली: भारताच्या पुढील राष्ट्रपतींचे नाव काही तासांत निवडणूक आयोगासमोर येईल. देशभरातून आणलेल्या मतपेट्यांची मोजणी आज सकाळी ११ वाजता संसद भवनात सुरू होईल. देशाचे १५ वे राष्ट्रपती आज देशाला मिळतील. द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या सत्ताधारी एनडीएच्या उमेदवार असून त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. पदभार स्वीकारताच त्या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती बनतील. विरोधकांनी मुर्मू यांच्यासमोर यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उभे केले आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा २५ जुलै रोजी होणार आहे.
संसदेत ९८.९% मतदान झाले-
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी ९८.९० टक्के मतदारांनी संसद भवनात मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक अधिकारी पी.सी. मोदींनी सदरील माहिती दिली. आयोगाने ७२७ खासदार आणि ९ आमदारांसह एकूण ७३६ मतदारांना संसद भवनात मतदान करण्याची परवानगी दिली होती. त्यापैकी ७१९ खासदार आणि ९ आमदारांसह ७२८ जणांनी मतदान केले.
दरम्यान देशभरातील राज्यांच्या विधानसभांमध्येही मतदान झाले. विविध राजकीय पक्षांची भूमिका लक्षात घेता या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. महाराष्ट्रातील शिवसेना पासून ते देशातील इतर अनेक पक्ष प्रमुखांनी मुर्मू यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काही अवधीतच देशाला १५ वे राष्ट्रपती मिळतील.
महत्वाच्या बातम्या:
- LLC 2022 : लिजेंड लीग क्रिकेटमध्ये खेळण्याबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी दिले उत्तर, म्हणाले…!
- Pratap Sarnaik : ठाणे आणि मिरभाईंदरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यानी 900 कोटी दिले – प्रताप सरनाईक
- Viral Video : हॉटेलमध्ये नाना पटोलेंच्या खांद्यावर महिलेचं डोकं असलेला व्हिडीओ, चित्रा वाघ यांचं ट्विट
- Ben Stokes : बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर रवी शास्त्रींनी खेळाडूंच्या तणावाबाबत काढला नवा फॉर्म्युला, म्हणाले…!
- OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचे श्रेय महाविकास आघाडीचे – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
