पुणे : संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी पुणे शहरात जंबो कोविड रुग्णालयात भ्रष्टाचार केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी आणि पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यासाठी किरीट सोमय्या दिनांक ५ फेब्रुवारी शनिवार रोजी पुण्यात आले होते. त्यावेळी पुण्यातील शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात किरीट सोमय्या हे किरकोळ जखमी देखील झाले होते.
किरीट सोमय्या यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि शक्ती प्रदर्शन करण्यासाठी पुणे भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्या यांचा आज, ज्या पायरीवर किरीट सोमय्या पडले होते त्या पुणे महानगरपालीकेच्या पायरीवर सत्कार केला आणि आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले. ज्या पायऱ्यांवर किरीट सोमय्या पडले होते आणि त्यांचा नंतर पुणे भारतीय जनता पक्षाने सत्कार केला होता तीच पुणे महानगरपालिकेतील पायरी आज पुणे शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून स्वच्छ केली आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर ज्या शिवसैनिकांनी ठिकाणी हल्ला केला त्याच ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचा सत्कार केला. त्यानंतर काँग्रेसने नवी शक्कल लढवत पुणे महापालिकेच्या पायऱ्या चक्क गोमुत्राने स्वच्छ केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- “संजय राऊतला एवढी मस्ती, गुर्मी आहे की..”; सोमय्या आक्रमक
- मास्क आता बंद होणार?; अजित पवारांनी केला खुलासा
- आदिती तटकरेंना पालकमंत्री पदावरून हटवा; शिवसेना आमदारांची मागणी
- हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

