मुंबई : २०१९मधील विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला बाजूला सारून महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांना एकमताने राज्याचा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय एकमताने करण्यात आला. २०२२ च्या मे महिन्यात महाविकास आघाडी सरकारला, राज्यात सरकार स्थापन करून अडीच वर्ष पूर्ण होतील. परंतु राज्यातील या महाविकास आघाडीच्या सरकारमधील अंतर्गत राजकारण थांबत नाहीये .
रायगड जिल्ह्यातील तीन आमदारांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना त्वरित रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून दूर करण्यात यावे अशी मागणी केली आहे. आदिती तटकरे मनमानी कारभार करत आहेत. शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात लुडबूड करत आहेत. परस्पर निर्णय घेतात, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे “रायगडच्या पालकमंत्र्यांना बदला अशी मागणी केली” अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. शिवसेनेचे वरिष्ठ नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्याकडेही या आमदारांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात कुरघोडीचे राजकारण चालू आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबईत दोन्ही पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेऊन, एकत्रित येऊन काम करण्याचा सल्ला दिला होता. पालकमंत्री आदिती तटकरे यांना जिल्ह्याचा कारभार पाहताना शिवसेनेच्या आमदारांना विश्वासात घ्या, अशी सूचना देण्यात आली होती. मध्यंतरी दोन्ही पक्षात रायगड जिल्ह्यामध्ये कारभार आणि संवाद सुरळीत चालू होता, मात्र जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाला पुन्हा तोंड फुटले आहे आणि रायगड जल्ह्यातील शिवसेनेच्या तीन आमदारांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना त्वरित रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून काढून टाकावे अशी मागणी केली आहे. भरत गोगावले,भरत दळवी आणि महेंद्र सदाशिव थोरवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आदिती तटकरे यांना त्वरित पालकमंत्री पदावरून हटवा अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- भाजपच्या माजी खासदाराला अश्लील व्हिडिओ दाखवून फसवले, लुटले हजारो रुपये
- ‘माणसं नाहीतच, हे तर हैवान’; चित्रा वाघ यांची तीव्र प्रतिक्रिया
- नरेंद्र मोदींचे आश्वासन पूर्ण; शेतकऱ्याच्या खात्यात आले पंधरा लाख; मात्र…
- महाराष्ट्रात टोळीचे सरकार – चंद्रकात पाटील
- चंद्रकांत पाटलांच वक्तव्य चुकीचं; ‘त्या’ आरोपांवरुन अजित पवारांचा पलटवार

