बंगळुरू: कर्नाटक राज्यातील हिजाब प्रकरणाबाबत सध्या सगळीकडे चर्चा आणि प्रतिक्रिया सुरू आहेत. हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असून त्यावर सोमवार १४ फेब्रुवारी पर्यंत पूढील सुनावणी होणार आहे. याच प्रकरणी आता कर्नाटक उच्च न्यायालयाने एक नवीन निर्णय देत सर्वांना मोठा झटका दिल आहे. न्यायालयाने या खटल्याच्या निकल येई पर्यंत कर्नाटकातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमद्धे कोणताही धार्मिक पोशाख करून येण्यास विद्यार्थ्यांना बंदी घातली आहे.
तसेच हा वाद आणखी चिघळू नये म्हणून शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाने पूढील ७ दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याच्या निर्णयात बदल करून शाळा महाविद्ययाळे सुरू करण्याचे आदेश देखील दिले आहेत.
मागील काही दिवसात कर्नाटकात हिजाब घालून येणाऱ्या मुलींना प्रवेश नाकारला होता. त्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला गेला होता. त्या खटल्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. त्याच्या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. दरम्यान या हिजाब बंदीला विरोध करण्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी आंदोलने आणि विरोध प्रदर्शने केली गेली होती.
महत्वाच्या बातम्या:
- ‘माणसं नाहीतच, हे तर हैवान’; चित्रा वाघ यांची हिंगणघाट प्रकरणी प्रतिक्रिया
- “माझा बल्ड प्रेशर १५२ आहे, तरी…”; जामीन मिळताच नितेश राणेंची प्रतिक्रिया
- हिजाब वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया…
- हिजाब बंदीवर जितेंद्र आव्हाडांचे भाजपला निशाणा करत खोचक ट्विट; वाचा सविस्तर
- महाराष्ट्रात टोळीचे सरकार – चंद्रकात पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
