मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही महिन्यांपासून वाढ होत असल्याचे दिसत होते. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता मास्कबंदी होणार असल्याची देखील चर्चा होत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
राज्यात करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत असताना करोनाच्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. यासोबतच आता मास्क सक्तीपासून मुक्ती मिळणार असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कचा वापर थांबवण्यासंबंधी चर्चा झाल्याचंही बोललं जात होतं. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंसोबत त्यांच्या वरळी तसचं दादर, माहीम परिसरातील विकासकामांची पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांना मास्कमुक्तीसंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळात मास्कपासून मुक्ती मिळणार असल्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. जोपर्यंत करोना जात नाही तोपर्यंत मास्क लावावाच लागेल असं मी याआधीही सांगितलं आहे. आमची जेव्हा कधी मंत्रिमंडळ बैठक होते तेव्हा काही चॅनेल अशा बातम्या चालवतात. अशा काही बातम्या चालवू नका. ज्यावेळी मास्क काढण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू. तोपर्यंत मास्क ठेवायचा म्हणजे ठेवायचा, असं स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “कॉंग्रेसवाले मत लेलो मोदीजीसे पंगा…” रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी
- हम साथ-साथ है ! आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अजित पवारांचा दौरा
- Promise Day Special! जयंत पाटलांनी शरद पवारांना दिले ‘हे’ वाचन
- IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना आज रंगणार
- विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

