नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल मोठा दिलासा मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काल तीन कृषी कायदे (Farm Law) मागे घेतले आहेत. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही, असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. शेतकऱ्यांच्या या लढयाला प्रदीर्घ काळानंतर यश मिळाल्याने काँग्रेसच्या वतीनं ‘शेतकरी विजय दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाळ (K.C Venugopal) यांनी सर्व राज्य घटकांना 20 नोव्हेंबर रोजी राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर कॅन्डल मार्च काढण्यास सांगितले आहे, आपल्या हक्कांसाठी लढताना मोर्चे आणि आंदोलनांमध्ये प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ ‘शेतकरी विजय दिवस’ साजरा केला जाणार आहे, असंही सांगितलं आहे.
दरम्यान, वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना जाहीर पत्र लिहून अभिनंदन केले आहे. येत्या 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडून याबाबतची संसदीय प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय आहे. गोठवणारी थंडी, कडक ऊन, पाऊस अशा संकटाना गेले वर्षभर तुम्ही तोंड देत तिन्ही शेतीविरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी तुम्ही जो सत्याग्रह जिंकलात, तो स्वतंत्र भारताच्या इतिहासात सापडत नाही. या लढ्यात शेतकऱ्यांनी दिलेल्या बलिदानाला मी नमन करतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘बैल कितना भी अड़ियल क्यों न हो, पर..’, राऊतांचा मोदींना अप्रत्यक्ष टोला
- रायगडात महागाईविरोधात कॉंग्रेसचे जनजागरण अभियान; मंत्री वडेट्टीवारांची उपस्थिती
- ‘आयपीएल नसती तर कदाचित हर्षल पटेलला भारतीय संघात स्थान मिळाले नसते’
- ‘मानिके मागे हिते’ गाण्याचा अमृता फडणवीसांनी केलं रिमेक गाणं, पाहा व्हिडीओ
- ‘असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय’; राहुल गांधी यांचे शेतकऱ्यांना पत्र


