Share

Budget 2022: देशाला मजबूत आर्थिक धोरण हवेत, जुमलेबाजी नाही; बजेटवर कॉंग्रेसची टीका

Published On: 

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज बजेट सादर केले. गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनामुळे आर्थिकचक्र कोलमडले होते. त्यामुळे आजचे हे बजेट अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. मोदी सरकारच्या (Modi Government) कार्यकाळातील हे तिसरे बजेट आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान कॉंग्रेस पक्षाने मात्र बजेटवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावरील आव्हानांचा सामना करत आहे मात्र या परिस्थितीत देखील भारतानं कोरोनो महासाथीच्या आव्हानांचा चांगला सामना केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी सांगितलं की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या एका अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये पुढील २५ वर्षाची ब्ल्यू प्रिंट असेल, असंही यावेळी सीतारमण म्हणाल्या.

दरम्यान कॉंग्रेसने (Congress) बजेटवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन बजेट सादर होण्याआधीच टीका करायला सुरुवात केली आहे. यावेळी ट्विट करत म्हणले आहे की, देशाला मजबूत आर्थिक धोरणांची गरज आहे, जुमलेबाजीची नाही, अशी टीका मोदी सरकारवर कॉंग्रेसने केली आहे. तसेच या सोबत जनता की बात हा हॅशटॅगही वापरला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!