Share

BUDGET 2022 : ४०० वंदे भारत ट्रेन, ६० लाख नव्या नोकऱ्या, केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. त्यात त्यांनी ४०० नव्या वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. तसेच देशात येणाऱ्या काळात ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीत मोठी गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प (CENTRAL BUDGET) सादर करण्यास सुरुवात केली आहे. तब्बल ६० लाख नव्या नोकऱ्या, ४०० नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी बजेटची ओपनिंग केली. मात्र, यासाठी निधी कसा आणि कुठून आणणार याचा उल्लेख त्यांनी भाषणात तरी केला नाही. मात्र, आगामी पाच राज्यांच्या निवडणुका पाहता या बजेटमध्येही असाच घोषणांचा धडाका राहू शकतो. अर्थमंत्री आपल्या भाषणात म्हणाल्या की, कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. मात्र, तरीरी जीडीपी ९.२ टक्के राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शिवाय आपल्या अर्थसंकल्पात येत्या पंचवीस वर्षांची ब्लू प्रिंट असेल, असा आशावादही त्यांनी केला.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण भाषणात म्हणाल्या की, पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. देशात ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. विशेषतः या बजेटमधून सामान्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न असेल. येणाऱ्या काळात लवकरच LIC चा IPO बाजारात आणला जाणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. मात्र, या नोकऱ्या कोणत्या क्षेत्रात असतील. याचा उल्लेख त्यांनी केला नाही.

मोठ्या शहरांची गरज ओळखून मेट्रो तयार केल्या जातील. स्थानिक व्यापाराला महत्त्व दिले जाईल. अनेक ठिकाणी मेट्रोचे जाळे उभारण्यात येईल. त्यासाठी वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना आणू. तसेच छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना याचा लाभ होणार आहे. २०२२-२०२३ मध्ये आठ ठिकाणी रोप वे सुरू करण्यात येईल तसेच रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल वापरणार असल्याची घोषणाही यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!