Share

Budget 2022 : मानसिक आरोग्याच्या समस्यासाठी ‘राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ’ कार्यक्रम सुरू केला जाईल- निर्मला सीतारामन

Published On: 

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी त्यांनी मानसिक आरोग्यातील वाढत्या (Growing mental health problems,)समस्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

“साथीच्या रोगाने सर्व वयोगटातील लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. दर्जेदार मानसिक आरोग्य समुपदेशन आणि काळजी सेवांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश करण्यासाठी, राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ कार्यक्रम (Launches National Tele-Mental Health Program) सुरू केला जाईल”, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

यामध्ये २३ टेली मेंटल हेल्थ सेंटर ऑफ एक्सलन्सचे नेटवर्क समाविष्ट असेल ज्यामध्ये निम्हन्स नोडल सेंटर असेल आणि यासाठी आयआयआयटी बंगलोर तंत्रज्ञान सहाय्य प्रदान करेल. तसेच नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ आणले जाईल. यामध्ये आरोग्य पुरवठादार आणि आरोग्य सुविधांच्या डिजिटल नोंदणी, आरोग्याची अनोखी ओळख आणि आरोग्य सुविधांचा सार्वत्रिक प्रवेश यांचा समावेश असेल. असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!