Share

IPL 2022: लखनऊ सुपरजाईंट्सचा नवीन लोगो जाहीर; मात्र चाहते म्हणाले..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या हंगामात दोन नवीन संघाचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात अहमदाबाद आणि लखनऊ यांचा समावेश आहे. अहमदाबाद च्या संघाने अजून त्यांचे नावही जाहीर केले नाही. मात्र लखनऊने आपले नाव आणि नवीन लोगो हि जाहीर करून टाकला आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लोगो जाहीर केला. मात्र चाहत्यांना त्यांचा हा लोगो भावलेला दिसला नाही.

लखनऊ सुपरजईंट्स हा संघ संजीव गोयंका यांचा आहे. त्यांनी याआधी दोन वर्ष पुणे सुपरजाईंट्स हा संघ आणला होता. त्यामुळे चाहत्यांनी नावही सारखे ठेवले यावरून लखनऊवर टीका केली होती. आता लोगो रिलीज झाल्यावरही त्यांनी अशीच प्रतिकीर्या दिली आहे. लखनऊच्या नवीन लोगो मध्ये निळ्या रंगाच्या बॅटला दोन सोनेरी पंख लागलेले दिसत आहे. पुणे सुपरजाईंटसचा लोगोही जवळपास असाच होता. ज्यात जांभळ्या रंगाच्या बॉलला सोनेरी पंख होते. यामुळे आता लखनऊला नावानंतर लोगोसाठीही टीकेचा सामना करावा लागत.

https://twitter.com/Umakant_27/status/1485614224944807936

लखनऊ सुपरजाईंट्सने लोगो रिलीज केल्यानंतर त्यासंबंधी एक विशेष गोष्ट सुद्धा सांगितली आहे. लोगोला पौराणिक कथांचा संबंध असल्याचे सांगितले आहे.” लखनऊ सुपरजाईंट्स भारताच्या नवीन आयपीएल संघाचा लोगो भारताच्या पौराणिक कथांनी प्रेरित आहे. पौराणिक पक्षी गरुड – संरक्षक आणि वेगाने फिरण्यास सक्षम आहे , त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही पंख असलेला लोगो तयार केला आहे. भारतीय संस्कृतीत गरुड सर्वव्यापी आहे. लोगोचे तीन रंगीत पंख लखनऊ संघाचे देशभरातील आकर्षण दर्शवतात. पक्ष्याचे शरीर निळ्या रंगाच्या बॅटने चित्रित केले आहे, जो क्रिकेटच्या खेळाचा रंग आहे. दुसरीकडे, केशरी शिवण असलेला लाल चेंडू विजय टिळकांसारखा आहे. एकंदरीत, हा लोगो सकारात्मक उर्जा दर्शवतो, जो पुढे जाण्याची आणि यश मिळवण्यासाठी प्रेरणा देतो. लखनऊ सुपर जायंट्स हा प्रत्येक भारतीयाचा संघ आहे. हा एक संघ आहे जो देशाला एकत्र करतो.” एकूणच लोगोला जरी पौराणिक कथांचा संबंध असला तरी तो पुणे सारखाच असल्याचे नेटकर्त्यांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!