Share

Budget 2022 : केमिकल फ्री शेतीला प्रोत्साहन देणारे-अतुल भातखळकर

Published On: 

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने समोर आली. आता अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यासाठी या अर्थसंकल्पात काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘बजेट 2022-23 : केमिकल फ्री शेतीला प्रोत्साहन देणारे, शेतकऱ्यांना डिजिटल आणि अद्ययावत तंत्रज्ञान देणारे, ड्रोन शक्ती : ड्रोन तंत्रज्ञानासाठी प्राधान्य. २०४७ पर्यंतची ब्लू प्रिंट असणारे बजेट, वन स्टेशन वन प्रॉडक्ट संकल्पना, सप्लाय चेन इन्फ्रा वाढवण्यासाठी ४०० नव्या वंदे भारत गाड्या, पर्वतमाला कार्यक्रम :- पर्यटनाला प्राधान्य देणारे, ८ नवे रोप वे प्रोजेक्ट सुरु करणार’

‘आत्मनिर्भर भारत योजनेला बळ, डिजिटल इकोनॉमीला प्रोत्साहन, पुढच्या २५ वर्षांचा पाया रचणारे बजेट, भारत @७५ ते भारत @१०० हा प्रवास पूर्ण करण्यासाठी पाच वर्षात ६० लाख नव्या नोकऱ्या आणि ३० लाख कोटी उत्पादन’ अशी प्रतिक्रिया अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!