नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. त्यात त्यांनी भारतीय रिर्जव्ह बँक डिजीटल करन्सी आणणार असल्याची मोठी घोषणा केली. त्यामुळे डिजीटल करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुण वर्गाला फायदा होणार आहे. तसेच पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
अर्थमंत्री पुढे म्हणाल्या, सेंट्रल बँक डिजीटल करन्सीची सुरुवात करणार आहे. डिजीटल रुपी येणार आहेत. येणाऱ्या काळात सीडबीच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल. पायाभूत विकासांच्या विकास कामासाठी खासगी गुंतवणूकदारांची मदत घेण्यात येणार आहे. ‘सेझ’चा कायदा बदलण्यात येईल. आता राज्य सरकार उद्योगामध्ये भागीदार होतील. येत्या वर्षभरात खासगी नेटवर्क प्रोव्हायडरच्या सहकार्याने ५ जी सेवा सुरू करू. भारत नेटद्वारे गावे इंटरनेटने जोडू, अशा महत्वपूर्ण घोषणा निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात केल्या आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पात २५ वर्षांची ब्ल्यूप्रिंट आहे. विकास हाच या बजेटचा हेतू असून शेतकरी, महिला आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून हा बजेट तयार करण्यात आला आहे. तसेच देशाच जीडीपी पुढील आर्थिक वर्षात ९.२ टक्के राहणार आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेला बुस्टर मिळणार असल्याचे यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षापासून देश कोरोना संकटाशी झुंज देत असताना सीतारामण यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा करून देशवासीयांना मोठा दिलासा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Budget 2022 : मानसिक आरोग्याच्या समस्यासाठी ‘राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ’ कार्यक्रम सुरू केला जाईल- निर्मला सीतारामन
- Budget 2022 : केमिकल फ्री शेतीला प्रोत्साहन देणारे-अतुल भातखळकर
- हॉकी प्रो लीग: भारतीय महिला संघाकडून चीनचा ७-१ने पराभव
- “अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दोन वर्ष फुकट गेली, याला सर्वस्वी जबाबदार मोदी सरकार”, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
- “मुख्यमंत्री दारात वाईन… मद्यधुंद सरकारची नशा कधी उतरणार?”, चित्रा वाघ यांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

