नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आज दहाव्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. शनिवारी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी पार पडली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी नवे कृषी कायदे मागे घ्यावे या आपल्या भूमिकेचं समर्थन करत जवळपास ‘मौन व्रत’ धारण केलं. सरकारनं हे कायदे मागे घेणार की नाही याचं उत्तर केवळ ‘होय’ की ‘नाही’ या शब्दांत द्यावं अशीही भूमिका शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी घेतली आहे.
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. शनिवारी शेतकरी आणि सरकारमध्ये झालेली चर्चा देखील निष्फळ ठरली. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी जाहीर केलं आहे. त्याआधी ८ डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या भारत बंदला आता कॉंग्रेसने पाठींबा दिला आहे. आंदोलक शेतकऱ्यांना पुकारलेल्या ८ डिसेंबरच्या भारत बंदला काँग्रेसचाने देखील पाठिंबा आहे. हा बंद यशस्वी करण्याची काळजी कॉंग्रेस घेणार आहे.
दरम्यान दुसरीकडे पंजाब किसान युनियनचे नेते रुलधू सिंह यांनी सांगितलं की, "किसान युनियनच्या नेत्यांनी मौन व्रत धारण केलंय. सरकार हे कायदे मागे घेणार की नाही या प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाही."पंजाब किसान युनियनचे कायदेशीर सल्लागार गुरलाभ सिंह महल यांनी सांगितलं की, "सरकार हे कायदे मागे घेणार की नाही याच उत्तर ‘होय’ किंवा ‘नाही या शब्दात शेतकऱ्यांना उत्तर अपेक्षित आहे. शनिवारच्या पाचव्या फेरीच्या बैठकीत शेतकरी नेते आपल्या तोंडावर बोट ठेऊन होय की नाही असा फलक हातात घेऊन बसले होते."
सलग दहा दिवस आंदोलन सुरु असतानाही सरकारला त्याची पर्वा नाही, सरकारला कोणताही तोडगा काढायचा नाही असं मत शेतकऱ्यांच्या नेत्यांचं झाल्याचंही काहींनी सांगितलं. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता मौन व्रत धारण केल्याचं सांगितलं जातंय.
तर आता शरद पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भेट घेणार आहेत. शरद पवार राष्ट्रपतींशी कृषी कायद्यांविषयी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार देखील मैदानात उतरले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पवारांनी राहुल गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ व्यक्तव्याकडे वडिलकीचा संदेश म्हणुन पाहावे : राष्ट्रवादी
- मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी आता शरद पवार मैदानात ९ डिसेंबरला राष्ट्रपतींना भेटणार
- ‘शेतकरी हे आई वडिलांपेक्षा कमी नाही’ : सोनू सूद
- मतदार नोंदणीतील दुर्लक्ष भाजपला भोवले- देवेंद्र फडणवीस
- शेतकऱ्यांच्या एल्गाराचा आज दहावा दिवस, ८ तारखेचा भारत बंद होणारच…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

