🕒 1 min read
नागपूर : शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र येत सत्ता स्थापन केली. भिन्न विचारसरणी असलेल्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याआधी काँग्रेसने काहीशी मुत्सद्दी भूमिका घेतली होती. तर, गेल्या वर्षभरात सत्तेत असून देखील दुय्यम वागणुकीमुळे नाराजी उघड केली.
या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सद्या औरंगाबादच्या नामांतरावरून बाळासाहेब थोरात यांनी विरोधी भूमिका घेतल्याने शिवसेना व काँग्रेसमध्ये ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. अशातच आता थोरात प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होतील अशा हालचाली सुरु झाल्या आहेत.
थोरात कोणत्याही क्षणी प्रदेशाध्यक्षपद सोडतील आणि नव्या प्रदेशाध्यक्षाची हायकमांडकडून घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बाळासाहेब थोरात काल रविवारपासून दिल्लीत आले आहेत. दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांची भेट घेऊन चर्चाही केली. यानंतर त्यांनी काँग्रेसचे नेते व राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्याशी देखील चर्चा केली.
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपद सोडण्यावर थोरात हे ठाम असून पुढील प्रदेशाध्यक्षपदी अनेक इच्छूकांची नवे घेतली जात आहेत. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना देखील ही जबाबदारी दिली जाऊ शकते अशी शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. यावर खुद्द पटोलेंनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.
‘विधानसभेचे अध्यक्षपद मी मागितलेलं नव्हतं. हायकमांडने मलाही जबाबदारी दिली. महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभेच्या अध्यक्षाची नोंद मीडियाने घेतलेली आहे. ते माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण याचा वापर जनतेच्या हितासाठी केला. त्यामुळे मी कोणतंही पद मागितलं नाही. जर त्यांनी जबाबदारी दिली, त्याला प्रामाणिकपणे पूर्णत्वास नेणे ही माझी जबाबदारी आहे’, असं नाना पटोले म्हणाले आहेत. काँग्रेस नेते व आमदार पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव, मंत्री यशोमती ठाकूर यांची देखील नावे या शर्यतीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- त्या ‘वर्षा संजय राऊत’ आहेत, त्या समर्थ आहेत; ईडी चौकशीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- मला बिझनेस नाही तर फक्त विज्ञान समजतं; कोवॅक्सिन उत्पादक कंपनीच्या प्रमुखांचं वक्तव्य
- आदर्श गाव हिवरे बाजारसह राळेगणसिद्धीत बिनविरोध नाही; अण्णांसह पोपटरावांना धक्का
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला औरंगजेबाबद्दल एवढं प्रेम का ?’
- शेतकरी नेते कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम, तर पुढील बैठकीत तोडगा निघेल; केंद्रीय मंत्र्यांना विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

