🕒 1 min read
पुणे: महाराष्ट्र्र राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यात रोज खटके उडत आहेत. मध्यंतरी महाराष्ट्र राज्यातील सुपरमार्केट मध्ये वाईन उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तोंडसुख घेत होते. कालच किरीट सोमय्या यांनी मुंबई मध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्या ( ५/२) रोजी आपण पुण्यात जाऊन शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसांकडे जाऊन तक्रार करणार आहोत आणि संजय राऊत व त्यांचा निकटवर्तीयांचे काळे धंदे बाहेर काढणार आहे अशी घोषणा केली.
किरीट सोमय्या संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार कारण्यासाठी पुण्यात येताच पुणे शहरातील शिवसैनिकांनी राडा घालायला सुरुवात केली. किरीट सोमय्या पुण्यात आल्यावर ते पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांना भेटण्यासाठी पुणे महानगगरपालिका भवनात गेले असताना शहरातील हजारो शिवसैनिक आक्रमक झाले. किरीट सोमय्या पुणे महानगरपालिका भवनात येणार हे कळताच शहरातील हजारो शिवसैनिक पुणे महानगरपालिका इमारतीच्या परिसरात जमले आणि आक्रमक झाले, आक्रमक शिवसैनिक किरीट सोमय्या यांच्या अंगावर धावून गेले असता किरीट सोमय्या पुणे मनपा भवनाच्या पायऱ्यांवर पडले आणि त्यांना किरकोळ जखमही झाली आहे. पुणे महानगरपालिकेतील शिवसैनिकांचा हा राडा जवळपास ५-१० मिनिट सुरु होता. या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षावर,” पायाखालची वाळू घसरली कि माणूस बेफान पणे वागतो त्याला आपण काय करत आहोत याचे तारतम्यच राहत नाही.
जेव्हा चर्चा करायला मुद्दे नसतात तेव्हा काही लोक गुद्द्यांवर येतात आणि हीच शिवसेनेची पूर्वीपासूनची संस्कृती राहिली आहे. काही कालावधीपूर्वी शिवसैनिकांनी भावना गवळी यांच्यावर हल्ला केला होता आणि आज काहीच मुद्दे नसल्यामुळे आणि पायाखालची वाळू घसरल्यामुळे शिवसेना सैरभैर झाली आहे. पण आम्ही शांत बसणार नाही, आमचा भारतीय कायद्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि आम्ही शिवसैनिकांच्या या राड्याला कायद्याच्याच भाषेत उत्तर देणार आहोत असेही चंद्रकांत दादा पाटील बोलताना म्हणाले. दरम्यान पुणे महानगरपालिका भवनात असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना जी धक्काबुक्की केली त्यामुळे किरीट सोमय्या किरकोळ जखमी झाले असून ते सध्या पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार घेत आहेत अशीही माहिती त्यांनी दिली .
महत्वाच्या बातम्या :
- अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीचा भीषण अघपात, अपघातानंतर भावूक पोस्ट शेअर
- अण्णा हजारे उपोषणाला बसणार
- Shivsena VS BJP : पुण्यात शिवसैनिक आक्रमक; सोमय्यांना केली धक्काबुक्की
- राज ठाकरे लता दीदींच्या भेटीला
- अफगाणिस्तानचा मोहंमद शेहजाद अडकला मोठ्या वादात ; फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
