Share

“विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले बदल मागे घ्या, अन्यथा…”; अभाविपचा इशारा

Published On: 

पालघर : येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेले बदल मागे घेण्यासाठी अभाविपने स्वाक्षरी अभियान घेतले. राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर कोणतीही चर्चा होऊ न देता लोकशाही पायदळी तुडवून गोंधळाच्या वातावरणात शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारे बदल करून विद्यापीठ कायदा असंविधानिक पद्धतीने पारित केला, असा आरोप देखील अभाविपने केला आहे.

“बदल केलेल्या विद्यापीठ कायद्यामुळे शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढणार आहे.विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे. विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले बदल मागे घेण्यात यावे, यासाठी अभाविप राज्यभरातील महाविद्यालयात स्वाक्षरी अभियान राबवत आहे. विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले बदल मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.”, असा इशारा अभाविप प्रदेश सह मंत्री योगेश्वर पुरोहित यांनी दिली.

यावेळी सहमंत्री योगेश्वर पुरोहित, प्रदेश अग्रिव्हीजन संयोजक प्रथमेश रासकर, पालघर बोईसर शहर मंत्री अमोल पाटील हे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!