Share

“हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र…”; खासदार इम्तियाज जलील यांची महाराष्ट्र सरकारला आठवण

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली: एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते संसदेत बोलत होते. या वेळी यांनी अनेक विषयांना स्पर्श केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वाईन विक्री धोरणाबद्दल त्यांनी सरकारची जोरदार टीका केली आहे.

इम्तियाज जलील म्हणाले,’महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वाटोळे केले आहे. महाविकास आघाडी सरकार किराणा दुकानात वाईन विकणार आहे. शिवसेनेच्या एका नेत्याचे म्हणणे आहे की वाईन पिल्याने नाश होत नाही. तर राष्ट्रवादीच्या एक नेता म्हणत आहे कि, बाहेरच्या देशात लोक पाणी पीत नाहीत, वाईन पितात. पण महाराष्ट्र आणि इतर देशांमध्ये एक मोठा फरक हा आहे कि, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि इथे तुम्ही लहान लहान मुलांच्या हातात वाईनच्या बॉटल देत आहात. आज वाईन पिणारा मुलगा उद्या बियर घेईल, नंतर व्हिस्की घेईल. काही पैसे कमावण्यासाठी जर महाराष्ट्र सरकार हे करत असेल तर राष्ट्रपती आणि केंद्र सरकारने त्यांना थांबवल पाहिजे.’

पुढे त्यांनी केंद्रावरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले,’२४९८ शेतकऱ्यांनी जानेवारी २०२१ पासून नोव्हेंबर २०२१ पर्यंत आत्महत्या केली आहे, त्याच काय कारण आहे. राष्ट्रपतींनी अभिभाषणात त्यांच्या स्वप्नातल्या देशाची कल्पना केली. पण सत्य वेगळे आहे. ज्या गरिबांना तुम्ही सहा वर्षांपूर्वी जी स्वप्न दाखवली होती, त्याचं काय झालं? २०२२ पर्यंत सर्व गरिबांना घर द्याची गोष्ट तुम्ही करत होते पण माझ्या मतदार संघात ऐंशी हजारांपैकी फक्त ३५५ लोकांना घर दिले गेले आहेत.
‘एमआयएम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर हल्ला झाला. त्यासंबंधी ही ते बोलले. ‘आपले मतभेद आपण दूर ठेवले पाहिजेत दोन महिन्यापूर्वी त्यांच्या घरावर हल्ला झाला होता त्यांचं घर पोलीस स्थानकाच्या जवळ आहे. हा वैयक्तिक मुद्दा नाही हा सुरक्षेचा मुद्दा आहे. दोषींवर कठोरात कठोर आणि लवकरात लवकर कारवाई करावी.’ अशी सूचना हि त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!