🕒 1 min read
मुंबई : युट्यूब आणि सोशल मीडिया फेम विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ याला वांद्रे न्यायालयाने अजून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विकास पाठक याला ४ फेब्रुवारी रोजी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली होती. आज त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याच्या कोठडीत वाढ करत त्याला अजून १४ दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आभासी (ऑनलाइन) परीक्षा घेण्यात याव्यात, ऑफलाइन परीक्षा घेतल्या जाऊ नयेत या मागणीसाठी युट्यूबवरुन एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालयाचे तरुण एकत्र येत आंदोलन सुरू झाले होते. धारवी येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केले गेले होते.
विद्यार्थ्यांची माथी भडकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याप्रकरणी त्याला नागपूर पोलिसांनी अटक करत मुंबईत आणले होते. वांद्रे न्यायालयात त्याच्यावर सुनावणी सुरू आहे. आता १४ दिवसांनी भाउवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “पायाखालची वाळू घसरली की…”; सोमय्यांना शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- Shivsena VS BJP : पुण्यात शिवसैनिकांचा राडा; किरीट सोमय्यांना केली धक्काबुक्की
- अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीचा भीषण अघपात, अपघातानंतर भावूक पोस्ट शेअर
- अण्णा हजारे उपोषणाला बसणार
- Shivsena Vs Bjp : पुण्यात शिवसैनिक आक्रमक; सोमय्यांना केली धक्काबुक्की
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
