Share

आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या ट्रेलरवर महेश भट्टची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बहुचर्चित दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Director Sanjay Leela Bhansali) यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (‘Gangubai Kathiawadi’) या चित्रपटावर भरपूर चर्चा होत आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून आलिया भट्टचे (Alia Bhatt) वडील दिग्दर्शक महेश भट्ट (father director Mahesh Bhatt)यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला बराच विलंब झाला आहे. चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाई यांची मुख्य भूमिकेत झळकणार असून ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आलियाचे वडील महेश भट्ट यांनी तिच्या भूमिकेचे कौतूक करत प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतच महेश भट्ट यांनी एका मुलाखतीमध्ये आलिया भट्टने साकारत असलेल्या ‘गंगूबाई’ या पात्राचे कौतूक केले. तसेच ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या ट्रेलरवर त्यांच्या प्रतिक्रियेत म्हणाले, ‘आलिया गंगूबाईच्या भूमिकेत योग्य वाटत आहे कारण तिने एक मॉडेल म्हणून स्वत:ला साच्यामध्ये अडकवून ठेवलेले नाही’ असे भट्ट यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील अनेक टप्पे ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

 महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!