🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा अडथळा येऊ नये यासाठी आज पहाटे लोंढे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यात्रेत अतुल लोंढे अडथळा आणणार होते. तसेच जनतेच्या प्रश्नांवर निदर्शने करणार होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटकाव घालण्यासाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाई नंतर कॉंग्रेसकडून निषेध केला जात आहे.
याबाबत खुद्द लोंढे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. टे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दडपशाहीला विरोध करू नये म्हणून मला पहाटे अटक करण्यात आली आहे. मी याचा निषेद करतो. लोकांची घरे तोडून रस्ते बांधले आहेत. डंपिंग यार्डमुळे लाखो लोकांना दमा झालाय अशा साऱ्या अर्धवट कामांना जबाबदार कोण ? असा प्रश्न लोंढे यांनी विचारला आहे. शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली नाहीत, बेरोजगारांना रोजगार नाही, मग हा कसला जनादेश, असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महाजनादेश यात्रेवर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही यात्रा अतिशय महत्वाची मानली जात आहे. या यात्रेवर मुख्यमंत्री फडणवीस गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेत आहेत. तर यात्रेद्वारे ते लोकांशी संवाद साधत आहेत.
महत्वाच्या बातम्या
#पक्षांतर : भाजप प्रवेशाबद्दल बजरंग सोनावणे म्हणतात…
आम्ही सोबतच, १५ दिवसांत जागावाटपाबाबत निर्णय घेणार : देवेंद्र फडणवीस
‘भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन देणे होय’
ठरलं तर मग ! युतीत केवळ 103 जागांवर होणार 50-50 जागावाटप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
