Share

‘भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन देणे होय’

Published On: 

नागपूर : भाजपचे सदस्य होणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देश मजबूत करण्याच्या कार्याला समर्थन देणे होय. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासह सीमेपलिकडेही देशाचे वर्चस्व कायम करण्याला समर्थन देणे होय. भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन देणे होय, असे मत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले.

भाजपच्या प्रभाग ३२ तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी, बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवारी स्मृती भवन, शारदा चौक येथे करण्यात आला. यावेळी शेलार बोलत होते.

भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. त्यामुळे संघटनेचा विस्तार करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपच्या सदस्यता नोंदणीचा क्रमांक जाहीर करीत सदस्यता घेणाऱ्या दोन सदस्यांचा सत्कार केला. कार्यकर्त्यांनी वस्त्या, गल्ली व चाळीत जाऊन अधिकाधिक सदस्य बनवावे, असे आवाहन केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!