Share

ठरलं तर मग ! युतीत केवळ 103 जागांवर होणार 50-50 जागावाटप

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत झालेली शिवसेना – भाजप युती ही विधानसभा निवडणुकीला देखील तशीच राहणार आहे. त्यामुळे भाजप – सेनेचा विधानसभेच्या जागा वाटपासाठी 50 – 50 हा फॉर्म्युला असणार आहे. 2014 मध्ये निवडून आलेल्या जागा त्या त्या पक्षांकडे राहतील मात्र उरलेल्या जागांवर 50 50 फॉर्म्युला वापरला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली.

यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजपने गेल्यावेळी १२२, तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. या जागा तशाच कायम ठेवत उर्वरित १०३ जागांपैकी निम्मे-निम्मे जागांचे वाटप होऊ शकते. तसेच युतीतील लहान मित्रपक्षांना भाजपच्या कोट्यातूनच जागा द्याव्या लागणार असल्याने आमदारांव्यतिरिक्तच्या जागांमध्ये भाजपच्या वाट्याला तुलनेने कमीच जागा येतील अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवली.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप – सेने युतीमध्ये अनेक मतभेद होते. तसेच मुख्यमंत्री पदाचा वाद देखील काही दिवस चालला होता. त्यामुळे भाजप सेना युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता होती. मात्र असं काही होणार नसून सेना – भाजप एकत्रचं लढणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, युती तोडा अशी मागणी काही ठिकाणी आहे; पण ती अजिबात तोडली जाणार नाही. स्वत:च्या सोईनुसार मित्रपक्षांना सोबत घ्यायचे वा टाकून द्यायचे हा भाजपचा संस्कार नाही. राजकारणात मित्र रोज बदलता येत नसतात.

महत्वाच्या बातम्या 

महाजनादेश यात्रा : मुख्यमंत्र्यांच्या वर्ध्यातल्या सभेत उडाला गोंधळ

मी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस

आघाडीला सुरुंग : 20 आमदार माझ्या संपर्कात – महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

विधानसभेत सर्व जागांवर लढण्याची तयारी ठेवा : मुख्यमंत्री

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!