Share

‘टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय?’ आव्हाडांच्या निर्णयावर आता काँग्रेसचा आक्षेप

Published On: 

जळगाव : गेल्या महिन्यात १७ मे रोजी मुंबई शहरात कर्करोगग्रस्तांचे नातेवाईक व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) उपलब्ध करून दिलेल्या १०० सदनिकांच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या.

कर्करोगग्रस्तांच्या उपचारासाठी परळच्या टाटा रुग्णालयात महाराष्ट्राच नव्हे, तर देशभरातून रुग्ण येत असतात. त्यांच्यासोबतच नातेवाईक, काळजीवाहू व्यक्ती येतात. परंतु त्यांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईत नसल्यामुळे त्यांची परवड होते. खासगी जागा आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे बरेचदा नातेवाईकांना फूटपाथवर राहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारच्या म्हाडा उपक्रमाने हा अभिनव उपक्रम हाती घेतल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आव्हाड यांनी दिली होती.

पण त्यांनतर काल आव्हाड यांच्या या ड्रिम प्रोजेक्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जोरदार धक्का दिला होता. टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याच्या आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली होती.

आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. ‘राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. अशा परिस्थितीत टाटाने आपला सीएसआर फंड वापरावा. टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय?’ असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल, नव्या पर्यायाला दिली मंजुरी !

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या 100 सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे.

त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिलीय. 100 सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देण्यात येत आहेत. काही स्थानिकांनी विरोध केला आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला आज बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला. बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!