मुंबई : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नामांतराला विरोध केला आहे. त्यामुळे, संभाजीनगर व्हावे अशी मागणी करणाऱ्या व राज्यासह औरंगाबाद महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची मात्र मोठी कोंडी झाली आहे.
आज भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादीच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘1995 ला महापालिकेत नामांतरराचा प्रस्ताव झाला. यानंतर युतीच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी दिली. सत्तांतर र झाल तेव्हा याच काँग्रेसनं म्हणजे आत्ता महाविकास आघाडीसोबत सत्तेत असणाऱ्यांनी हा प्रस्ताव बाजुला केला.’ असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला.
तर, याच काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं एकदा नाही तर दोनदा हा प्रस्ताव फेटळला. भारतीय जनता पार्टीनं २०१९ ला परत एकदा प्रस्ताव पाठवला होता. पण वारंवार प्रस्ताव पाठवून याकडे दखल घेतली नाही. राज्यात भाजपची सत्ता असताना औरंगाबादमधील भाजपच्या नगरसेवकांनी चार वेळा औरंगाबादच्या नामांतराचा विषय पुढे घेऊन जायचा प्रयत्न केला. मात्र औरंगाबादच्या महापौरांनी याबाबत काहीच केल नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना नामांतराचे प्रयत्न नक्कीच झाले आहेत. याबाबतचे पुरावे उपलब्ध आहेत’ असा दावा देखील केशव उपाध्ये यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- हॉट मलायकाने केला बिकिनीमध्ये योगा; फोटोवर चाहते फिदा
- मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला हिरवा कंदील, मात्र ‘हे’ नियम पाळावेच लागणार
- नामांतर : तेव्हा तुमचे मुख्यमंत्री काय झोपा काढत होते का ? देसाई भाजपवर कडाडले
- खडसेंबाबतची माहिती घेण्यासाठी ‘ईडी’चे अधिकारी पुण्यात दाखल
- टीम इंडिया सोबत डिनर : ऑस्ट्रेलियात चाहत्यांना कोट्यवधींचा गंडा


