मुंबई : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. अशातच आता राज्यातील महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पाठोपाठ समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी नामांतराला आपला विरोध दर्शवला आहे. यापाठोपाठ आता, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नामकरणास विरोध केला आहे. त्यामुळे, शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.
यावरून भाजपसह मनसे नेत्यांनी शिवसेनेला चांगलंच लक्ष्य केलं आहे. भाजपच्या टीकेला शिवसेनेचे नेते व व मंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय का घेण्यात आला नाही? त्यामुळे आता भाजपने आम्हाला उपदेश करण्याची गरज नाही. आमचं कर्तव्य म्हणून आम्ही औरंगाबादच्या नामांतरासाठी प्रयत्न करत आहोत आणि आम्ही ते करणारच, असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
तर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना औरंगाबादच्या नामांतराविषयी इतकीच बांधिलकी होती तर तुमचे सरकार असताना हा निर्णय का घेण्यात आला नाही? तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का ? असा सवाल देखील त्यांनी भाजपला केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई मा जलेबी ना फाफडा, ‘जनाबसेने’ला आपटा : भाजपा
- कर नाही त्याला डर कशाला; अरविंद सावंतांची गिरीश महाजनांवर टीका
- फियाट-प्युजोच्या विलीनीकरणातून निर्माण होणार जगातील चौथी मोठी वाहन कंपनी
- प्रदेशाध्यक्षपदासाठी आता तरुणांना संधी द्यावी,आम्ही त्यांच्या मागे उभे राहू : बाळासाहेब थोरात
- गिरीश महाजन अडचणी वाढल्या; पुण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ


