नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे महिन्याभरापूर्वी नव्या संसद भवनाच्या इमारतीची पायाभरणी झाली. ही इमारत, देशाच्या ‘आत्मनिर्भर भारत’ दूरदृष्टीचा अविभाज्य घटक ठरणार असून या रूपाने, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला जनतेची संसद उभारण्याची एक महत्वाची संधी मिळणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतांना म्हणजेच 2022 मध्ये या इमारतीत ‘नव भारता’ च्या इच्छाआकांक्षांचे अनुरूप प्रतिबिंब त्यात असेल असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.
लुटियन्स झोनमध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकामांना आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये पर्यावरणविषयक मंजुरींसह अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. यापूर्वी, सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीत ७ डिसेंबर रोजी नवीन संसद भवनासाठी पायाभरणी करण्यास परवानगी दिली होती. परंतु तेथे कोणतेही बांधकाम होणार नसल्याचेही निर्देश दिले. गेल्या वर्षी ५ नोव्हेंबरला कोर्टाने या प्रकरणात आपला निर्णय राखून ठेवला होता.
आता याप्रकणी सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या शिफारशी कोर्टाने कायम ठेवत बांधकाम चालू असताना पर्यावरणाची काळजी घेण्याचे सांगितले. यासोबतच या व्यतिरिक्त त्यांना बांधकाम दरम्यान स्मॉग टॉवर बसविण्यास सांगितले आहे. तर बांधकाम करण्यापूर्वी हेरिटेज समितीची मान्यता घेण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिल्या आहेत. न्यायालयाने बांधकाम करण्यास हिरवा कंदील दाखवल्याने नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या या नव्या संसद भवन इमारतीच्या बांधकामास आता गती मिळेल.
या प्रोजेक्टला सेंट्रल विस्टा असं संबोधलं जातं. विरोधकांनी या बांधकामावरून मोदी सरकारवर हल्लाबोल देखील केला होता. नव्या संसदेच्या वास्तूचं बांधकामाच कंत्राट हे टाटा कंपनीला मिळालं आहे. 2022 पर्यंत नव्या संसदेची वास्तू बांधून तयार होईल, असं या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. ही वास्तू 64,500 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर उभी राहणार आहे. या प्रकल्पासाठीचा साधारण खर्च 971 कोटी रुपये एवढा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- हॉट मलायकाने केला बिकिनीमध्ये योगा; फोटोवर चाहते फिदा
- काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कोरोना लसीला मान्यता देण्याच्या प्रक्रियेवर केले ‘हे’ प्रश्न उपस्थित
- नामांतर : तेव्हा तुमचे मुख्यमंत्री काय झोपा काढत होते का ? देसाई भाजपवर कडाडले
- खडसेंबाबतची माहिती घेण्यासाठी ‘ईडी’चे अधिकारी पुण्यात दाखल
- आशा भोसले यांचं इंस्टग्राम अकाऊंट हॅक; महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं केलं अलर्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
