पुणे:- भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना काही दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. याच प्रकरणातून खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ईडी मार्फत याच प्रकरणात खडसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस म्हणजे खडसे यांना खूप मोठा धक्का आहे, हे मात्र निश्चित आहे.
दरम्यान, भोसरी एमआयडीसी जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याबाबत व या प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी ED चे अधिकारी पुण्यात आले आहेत. ॲड.असीम सरोदे यांच्या कार्यालयात हे अधिकारी थोड्याच वेळात पोहोचत आहेत. पुण्याचे असीम सरोदे हे एकनाथ खडसेंच्या विरोधात भोसरी एमआयडीसी प्रकरणाची केस चालवत आहेत. त्यामुळे या प्रकरणाबाबत त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी ईडी अधिकारी पुण्यात त्यांच्या कार्यालयात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. फोन करुन पूर्वकल्पना देऊन हे अधिकारी आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आशा भोसले यांचं इंस्टग्राम अकाऊंट हॅक; महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं केलं अलर्ट
- नामांतर : तेव्हा तुमचे मुख्यमंत्री काय झोपा काढत होते का ? देसाई भाजपवर कडाडले
- फियाट-प्युजोच्या विलीनीकरणातून निर्माण होणार जगातील चौथी मोठी वाहन कंपनी
- मुंबई मा जलेबी ना फाफडा, ‘जनाबसेने’ला आपटा : भाजपा
- कर नाही त्याला डर कशाला; अरविंद सावंतांची गिरीश महाजनांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

