नागपूर : नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आणि वाद हे तसं जूनच समीकरण आहे. अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अशी प्रतिमा असलेले मुंढे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा तुकाराम मुंढे चर्चेत आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्याकडून नागपूर शहरात अनेक महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेण्यात आले. त्यांच्या काही निर्णयांवर राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे देखील मुंढे यांच्या कामांवर नाराज आहेत. ठाकरे यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर नियमबाह्य कामं केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. विकास ठाकरे यांनी याबाबत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्याचबरोबर आपण हा मुद्दा आगामी अधिवेशनात उचलणार असल्याची माहितीदेखील विकास ठाकरे यांनी दिली आहे
नेमकं काय म्हणणे आहे ठाकरे यांचे ?
‘गेल्या तीन महिन्यात अनेक तक्रारी आल्या. माझ्या मतदारसंघात तीन विषय होते. त्याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सांगितलं आहे. शहरातील बाजार बंद केले आणि लोकांच्या घरासमोर बाजार भरवले. जो बाजार सुरु आहे तो बंद करायचा आणि सामान्य जनतेच्या घरासमोर बाजार भरवायचा, ही कोणती पद्धत आहे?’
‘नगरसेवक, आमदार अशा लोकप्रतिनिधींकडे तक्रारी येतात. ते प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांकडे गेले तर अधिकाऱ्यांनी काय करावं, याचं भान ठेवलं पाहिजे. अधिकाऱ्यांकडून काम होत नसेल तर त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना आहे. आम्ही जे आरोप लावले त्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई होईलच’.
यंदा आषाढी वारीसाठी पंढरपुरात एकाही वारकऱ्याला प्रवेश नाही
तुकाराम मुंढेवर होणार कायदेशीर कारवाई, नागपूरच्या महापौरांचा इशारा
80 वर्षांचा योद्धा पुन्हा ‘फिल्ड’वर, आजपासून पवार कोकण दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
