पंढरपूर – जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा आषाढी यात्रेच्या सोहळ्याला येणारे सर्व पालखी सोहळे रद्द करीत प्रशासनाने अगदी मोजक्या वारकर्यात मानाच्या सात संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने आणण्याच्या हालचाली सुरु केल्या असताना राज्यभरातून एकही वारकऱ्याला या काळात शहरात प्रवेश न देण्यासाठी स्थानिक प्रशासनानेही कडक पावले उचलायला सुरुवात केली आहेत.
वारकरी संप्रदायाचा आषाढी सोहळा हा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. राज्यभरातून दरवर्षी 18 ते 20 लाख भाविक पंढरपुरात येत असतात. यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने यात्रेला थोडे जरी भाविक आले तर हा प्रसार राज्यभर पसरणारा असल्याने पंढरपुरात एकही वारकऱ्याला प्रवेश न देण्याची तयारी गांभीर्याने प्रशासनाने सुरु केली आहे.
आषाढीला येणारे भाविक पासेस घेऊन थोडे आधीच पंढरपुरात मुक्कामाला येऊ नये यासाठी शहरातील सर्व मठ व धर्मशाळांना प्रशासनाने नोटीस बजावून एकालाही राहण्यास जागा न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मठात आणि धर्मशाळेत असणारे मठाधिपती व सेवक यांची सध्या तपासणी पोलीस पथके जाऊन करीत असून प्रत्येक ठिकाणी नेमके कितीजण राहतात याच्या नोंदी गोळा करीत आहेत.
शहरातील भाविकांच्या निवासासाठी असणारे सर्व ४५० मठ , धर्मशाळा , हॉटेल्स व इतर खाजगी ठिकाणांना नोटीस देऊन तपासणीला सुरुवात केली आहे . याशिवाय आता एकही नागरिकाला पंढरपुरात प्रवेशासाठी परवानगी न देण्याचे पत्र राज्यातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.
जाणून घ्या, वारकऱ्यांच्या गळ्यातील तुळशी माळेचे महत्त्व
यापुढेही पंढरपुरात येण्याची संधी मिळावी – मुख्यमंत्री
पुढच्या एकादशीला युतीचा मुख्यमंत्रीच महापूजेला येईल – नीलम गोऱ्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

