Share

‘वर्षपूर्तीचा आनंद संपायच्या आतच काँग्रेस नेत्यांचे इशारे सुरू’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं, असं ट्वीट काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि राज्याच्या महिला-बालकल्याण मंत्री योशमती ठाकूर यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट म्हणजे सूचक इशाराच समजला जात आहे. आता यावरून भाजपानं त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीचा आनंद अजून संपायच्या आत काँग्रेस नेत्यांचे इशारे सुरू झाले, असं म्हणत भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती, लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्ष म्हणून मी आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटते असेल तर काँग्रेसच्या नेतृत्त्वावर टीका-टिप्पणी करणं टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्त्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे. असे यशोमती ठाकूर यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते.

काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिल्यानंतर आता यावरून भाजपानं त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीचा आनंद अजून संपायच्या आत काँग्रेस नेत्यांचे इशारे सुरू झाले, असं म्हणत भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!