Share

कर्नाटकात ‘जय श्री राम’ विरुद्ध ‘अल्ला हू अकबर’ वाद चिघळला

Published On: 

बंगळुरू: कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब बंदी विरुद्ध लढ्याला न्यायालयात न्यायाची प्रतीक्षा आहे. मागील काही दिवसात मुस्लिम विद्यार्थिनींना शाळेत आणि महाविद्यालयात हिजाब घालून येण्यावर बंदी घातली होती. त्याविरोधात न्यायालयात विद्यार्थिनींनी दाद मागितली आहे. परंतु काही ठिकाणी त्यांना विरोध करण्यासाठी हिंदू विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालायच्या आवारात भगवी शाल (शेला) घालून पहायला मिळाले.

एका विद्यार्थिनीचा या संदर्भात एक व्हिडिओ प्रसार मध्यमांवर सध्या चर्चेत आहे. महाविद्यालायत एक विद्यार्थिनी आपल्या गाडीने येते, ती गाडी वहानतळावर लाऊन महाविद्यालयाच्या इमारतीकडे चालत निघते, तेवढ्यात हातात भगवे शेले घेऊन सुमारे ५० – ६० विद्यार्थी तिला घेरतात आणि ‘जय श्री राम’ च्या  घोषणा देतात. ती सुद्धा ‘अल्ला हू अकबर’ (ईश्वर (अल्ला) सर्वात मोठा आणि महान आहे) च्या घोषणा देऊन प्रत्युत्तर देते. पुढे काही शिक्षक या विद्यार्थ्यांना पांगवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आणि विद्यार्थिनी आपल्या घोषणा सुरू ठेवते. तसेच हिंदू विद्यार्थी आपल्या घोषणा ती मुलगी इमारतीत जाईपर्यंत देत असतात.

हिजाब बंदी विरुद्ध न्यायालयात सध्या सुनावणी सुरू असून, तो पर्यंत कर्नाटक राज्य सरकारने ५ फेब्रुवारी रोजी काढलेल्या अध्यादेशाचे पालन करण्याचे आवाहन सर्व शाळा आणि महाविद्यालयांना केले आहे. यात हिंदू संघटना ‘बजरंग दल’ ने उडी घेतली असून त्यांनी हिंदू विद्यार्थ्यांना भगवा शेला घालणे आणि विद्यार्थिनींना भगवी ओढणी घालणे सक्तीचे केले आहे. कर्नाटकातील काही शाळा आणि महाविद्यालये सध्या ‘जय श्री रामच्या’ नाऱ्याने पेटून निघत आहेत.

या सर्व प्रकरणात मुस्लिम विद्यार्थिनींचे म्हणणे असे आहे की, आम्ही यापूर्वी देखील स्कार्फ (हिजाब) परिधान करत होतो. त्यावर पूर्वी कधी वाद झाला नाही की, कोणी आक्षेप घेतला नाही. आमच्या घरातील सर्व मुलींनी असेच शिक्षण घेतले आहे. मात्र आता हिजाब वर वाद उपस्थित केला जात असून, आम्हाला विरोध करायला हिंदू भगवे शेले घालून येत शाळेचे, महाविद्यालयाचे वातावरण दूषित करत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत कलम २५ ते २८ दरम्यान देशातील सर्व नागरिकांना धर्माचे, धार्मिक आचरणाचे स्वतंत्र दिले आहे. या सर्व वादात राज्यघटनेतील या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होताना दिसत आहे. बाबासाहेबांनी दिलेले हेच का ते धर्माचे स्वतंत्र? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. केवळ डोक्यावर ओढणी गुंडाळल्याने त्यांचा हा हिजाब शालेय गणवेशाच्या आड येतो आहे का ? मुस्लिम मुली यापूर्वी असाच पेहराव करून शाळा महाविद्यालयात शिकल्या. परंतु आता हा नवीन वाद का निर्माण झाला आणि त्यामागे राजकारण काय ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. शाळा, महाविद्यालयासारख्या पवित्र ठिकाणी हे असे वाद आणि दंगली निर्माण व्हाव्यात हे धर्मनिरपेक्ष भारतासाठी अनपेक्षित आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!