Share

‘जीन्स घालणाऱ्या मुलींना पंतप्रधान मोदी…’, काँग्रेस नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

भोपाळ : नेहमीच आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह(Digvijay Singh) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘जीन्स घालणाऱ्या मुलींना पंतप्रधान मोदी आवडत नाहीत, त्यांचा प्रभाव केवळ ४० वर्षांवरील महिलांवर आहे,’ असे आक्षेपार्ह विधान त्यांनी केले आहे. सिंह यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शनिवारी(२५ डिसें.) मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये जन जागरण अभियानाच्या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतांना दिग्विजय सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) यांच्या ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या थीमसंदर्भात बोलत असतांना ते म्हणाले की,’जीन्स घालणाऱ्या मुली आणि फोन ठेवणाऱ्या मुलींना मोदी आवडत नाहीत. फक्त ४० ते ५० वयोगटातील महिलांवर मोदींचा प्रभाव आहे. तसेच २०२४ मध्ये भाजपा पुन्हा जिंकल्यास भारतीय राज्यघटना बदलली जाईल, आरक्षण संपेल’, असेही दिग्विजय सिंह यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे बोलत असतांना सिंग यांनी सावरकरांविषयी भाष्य केले आहे. ते म्हणाले की,’काही हिंदू लोक गोमांस खातात तर काही खात नाहीत. पण, स्वतः सावरकरांनी हिंदू आणि हिंदूत्व या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचे आपल्या पुस्तकामध्ये म्हंटले आहे. तसेच स्वतः सावरकर म्हंटले आहेत की, स्वतःच्या मल-मुत्रामध्ये गाय लोळतात तर गाय आपली माता कशी काय होऊ शकते? गोमांस खाणं वाईट नाही,’ असेही सिंह यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!